मका, बाजरीच्या कापणीस वेग
By Admin | Updated: October 23, 2016 22:43 IST2016-10-23T22:43:31+5:302016-10-23T22:43:59+5:30
मका, बाजरीच्या कापणीस वेग

मका, बाजरीच्या कापणीस वेग
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरात खरीप पिकांच्या कापणीस वेग आला असून, सर्वत्र कापणी करताना शेतकरी वर्ग दिसून येत आहे.
दरवर्षी या वेळेस शेतकऱ्याजवळ उन्हाळी किंवा लाल कांदा विकून पैसा उपलब्ध होत असे. परंतु यावर्षी उन्हाळी कांद्याला भाव तर नाहीच तो चाळीत सडून खराब झाला आहे. या वेळेस लाल कांद्याची उशिरा लागवड झाल्याने विक्रीसाठी तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती पैसा उपलब्ध नाही. परंतु चालू वर्षी उशिरा पावसामुळे लाल कांद्याचे बियाणे उशिरा टाकले गेल्याने लाल कांद्याची उशिरा लागवड झाली. तसेच मध्यंतरी झालेल्या पावसामुळे जमिनीत तयार झालेला कांदा या पावसामुळे खराब झाला. जो उशिरा लागवड झाला आहे तो अजून तयार झाला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याला मका पिकाची कापणी व काढणी करून बाजारात विक्री केल्याशिवाय हाती दीपावलीसाठी पैसा नाही. त्यामुळे जास्त मजुरी देऊन मक्याची काढणी करून बाजारात विक्रीसाठी नेला जात आहे. (वार्ताहर)