नाशिक : शहरात होऊ घातलेल्या टोलेजंग इमारतींत आठव्या मजल्यावर आपत्कालीन राखीव माळा ठेवण्यावरून आता वेगळाच गोंधळ सुरू झाला आहे. हा माळा राखीव ठेवावा की केवळ पंधरा चौरस मीटरचे क्षेत्र राखीव ठेवावे याबाबत संभ्रम असल्याने अनेक इमारतींच्या परवानग्या रखडल्या आहेत. यासंदर्भात महापालिकेनेदेखील शासनाकडे मार्गदर्शन मागितले असून, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.सध्या सर्वच शहरांत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. सात मजल्यांपेक्षा अधिक मजले असलेली इमारत असेल तर त्यांना आठवा मजला आपत्कालीक राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या उंच इमारतीला आग लागली किंवा अन्य आपत्ती आली, तर सातव्या मजल्यापर्यंतच्या नागरिकांनी या आठव्या राखीव मजल्यावर जावे, तर नवव्या आणि दहाव्या मजल्यासारख्या त्यापेक्षा अधिक उंच मजल्यावर राहत असलेल्या नागरिकांनी त्याखालील मजल्यावर उतरावे आणि सुरक्षित राहावे अशी कल्पना आहे.
इमारतींच्या परवानग्या रखडल्या
By admin | Updated: April 15, 2015 00:25 IST