शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य बाजारपेठा बंद; उपनगरांत सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:33 IST

कोराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने ब्रेक द चेन धोरण आखले असून, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याच्या आदेशाला मंगळवारी (दि.६) मुख्य बाजारपेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कमी झाली नाही. तसेच मुख्य बाजारपेठ आणि मुख्य रस्तेवगळता उपनगरात आणि अन्यत्र दुकाने सुरूच होती. 

ठळक मुद्देब्रेक द चेन : दुकाने बंद असूनही नागरिकांची ठिकठिकाणी वर्दळ कायम

नाशिक : कोराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने ब्रेक द चेन धोरण आखले असून, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याच्या आदेशाला मंगळवारी (दि.६) मुख्य बाजारपेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कमी झाली नाही. तसेच मुख्य बाजारपेठ आणि मुख्य रस्तेवगळता उपनगरात आणि अन्यत्र दुकाने सुरूच होती. कोरोनाचा संसर्ग वाढत असून, लॉकडाऊन टाळण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, शनिवार व रविवार पूर्णत: व्यवहार बंद असल्याने सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुकाने, व्यवसाय आणि खासगी ऑफिसेस सुरू ठेवायचे काय, याबाबत सोमवारी संभ्रमाचे वातावरण होते. जिल्हा प्रशासनाकडून त्याला ठाेस उत्तर सुरुवातीला मिळाले नाही. मात्र सायंकाळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर अत्यावश्यक सेवावगळता अन्य सर्वच खासगी आस्थापना बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये संभ्रम कायम असल्याचे मंगळवारी (दि.६) दिसून आले. नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठा सामान्यत: सकाळी ९ वाजेनंतरच सुरू होतात. त्यातच पोलिसांनी बाजारपेठेकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडने अडवून ठेवले होते. मात्र, यानंतरही अनेक व्यापारी - व्यावसायिकांनी दुकाने उघडण्याच्या तयारीने कामगार- कारागिरांना बोलवून ठेवल्याने दुकानाच्या बाहेर आणि चौकात अनेक घोळके उभे होते. केवळ पार्सल सेवा उपाहारगृह, मिसळ विक्री अशा अनेक ठिकाणांहून केवळ पार्सल सेवाच सुरू हेाती. खाद्यपदार्थ आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू असल्याने नागरिकांना फारशी गैरसोय पहिल्या दिवशी जाणवली नाही. मात्र अनेक ठिकाणी अर्धे शटर डाऊन करून दुकाने सुरू असल्याचेही आढळले. कामगारांची गर्दीसिडकोत घरातच दुकाने असलेली अनेक छोटी दुकाने सुरू होती. नाशिकरोडला उपनगरात दुकाने खुली असल्याचे चित्र होते. पंचवटीत वेगळी स्थिती नव्हती. काही भागात तर बंदचा मागमूसही नव्हता. सातपूरला मुख्य बाजारपेठेत बंदचे वातावरण असले तरी कारखाने सुरू असल्याने कामगारांची वर्दळ कायम होती.

n    शहरातील सराफ बाजार, भांडी बाजार, कापडपेठ, मेनरोड, शिवाजीरोड, गाडगे महाराज चौक, रविवार कारंजा, शालिमार अशा सर्वच भागात दुकाने पूर्णत: बंद होती. केवळ खाद्यपदार्थ, उपाहारगृह तसेच औषध दुकानेच सुरू हाेती. काही भागात फेरीवाले वस्तूंची विक्री करीत असल्याचे आढळले. गंगापूररोड, त्र्यंबकरोड, कॉलेजरोड या भागातही दुकाने बंद होती. मात्र, अंतर्गत कॉलनी, काही व्यापारी संकुले येथे शटर अनेक दुकाने सहजपणे सुरू होती. n    नाशिकरोड परीसरात सकाळपासून  मुख्य बाजारपेठेते शुकशुकाट होता. दुपारनंतर बंद दुकानांच्या समोर भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली. त्यामुळे थोडीफार वर्दळ दिसली. n बंद बाबत व्यापाऱ्यांमध्ये सभ्रम असल्याने सकाळीच काही ठिकाणी दुकाने उघडण्यात आली होती. मात्र, पोलीसांनी आवाहन केल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली. मुख्य बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यांवर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर होती.यामुळे बंद करूनही गर्दी कमी झाली असल्याचे जाणवले नाही.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या