मुख्य बाजार आवार : पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

By Admin | Updated: July 25, 2016 23:09 IST2016-07-25T22:51:25+5:302016-07-25T23:09:27+5:30

लासलगावला डाळींब लिलावाचा शुभारंभ

Main market premises: The best response for farmers on the very first day | मुख्य बाजार आवार : पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

मुख्य बाजार आवार : पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

लासलगाव : येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात प. पू. भगरीबाबा यांची प्रतिमा व डाळींब क्रेट्सचे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व डाळींब उत्पादक शेतकरी उत्तम सानप यांच्या हस्ते विधिवत पूजन करून डाळींब लिलावाचा शुभारंभ झाला.
प्रारंभी सय्यद मोहसीन सय्यद मुश्ताक या खरेदीदाराने उत्तम अमरचंद सानप, रा. बोकडदरे यांचा भगवा जातीचे डाळींब रु. २५०१ प्रतिक्र ेट या दराने खरेदी केला.
यावेळी सभापती जयदत्त होळकर यांनी, लासलगाव व परिसरात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे उत्पादन झाल्याने डाळींब विक्रीसाठी जवळ सोय निर्माण व्हावी म्हणून लासलगाव बाजार समितीने गेल्या दोन वर्षापासून डाळींब लिलाव सुरू केले असून, त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती सुभाष कराड, सदस्य राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, अशोक गवळी, व्यापारी सदस्य सचिन ब्रह्मेचा, संदीप दरेकर, रमेश पालवे, सचिव बी.वाय. होळकर, डाळींब व्यापारी मोहसीन सय्यद, राहुल सानप, पापा शेख, तबरेज शेख, सुधीर मोरे, बाळासाहेब शिंदे, मनोज गोराडे, शादाब शेख, जितेंद्र माठा, कैलास सोनवणे, संजय साळुंखे, विजय शेटे, प्रभारी हिरालाल सोनारे, निरीक्षक राजेंद्र पाटील, दत्तात्रय होळकर, मनोज शेजवळ, गोरख विसे, विजय टापसे, ज्ञानेश्वर जगताप, सचिन वाघ यांच्यासह परिसरातील डाळींब उत्पादक शेतकरी उपस्थित होते. लिलावाचे पहिल्या दिवशी एकूण ३१६ क्रे ट्समधून डाळींब विक्र ीस आले. कमीत कमी १६० व जास्तीत जास्त २५०१ व सरासरी १५५० प्रति के्रट होते.(वार्ताहर)

Web Title: Main market premises: The best response for farmers on the very first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.