युवती सबलीकरण कार्यशाळा

By Admin | Updated: August 18, 2016 00:34 IST2016-08-18T00:33:36+5:302016-08-18T00:34:03+5:30

युवती सबलीकरण कार्यशाळा

Maiden Empowerment Workshop | युवती सबलीकरण कार्यशाळा

युवती सबलीकरण कार्यशाळा

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी व भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे येथील श्रीमती मंजुळाबाई रावजीसा क्षत्रिय (एसएमआरके) महिला महाविद्यालयात संयुक्तरीत्या युवतींच्या सबलीकरणासाठी कार्यशाळा पार पडली.
एकविसाव्या शतकातील सामाजिक आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थिनींना स्वयंनिर्भर आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, उपप्राचार्य कविता पाटील, प्रा. गीता यादव व प्रा. सुरेखा जोगी यांनी विद्यार्थिनींना चार सत्रांत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समोरपप्रसंगी उपप्राचार्य डॉ. मोहिनी पेटकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सुरेखा जोगी यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Maiden Empowerment Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.