मालेगावी सहा दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: December 4, 2015 21:47 IST2015-12-04T21:43:02+5:302015-12-04T21:47:11+5:30

मालेगावी सहा दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त

Mahelagavi seized with the help of six-wheelers | मालेगावी सहा दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त

मालेगावी सहा दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त

मालेगाव कॅम्प : कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झालेल्या दुचाकी व घरफोडीतील आरोपींना गजाआड करून लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राम भालसिंह यांनी दिली.
कॅम्प हद्दीतील परिसरातून गेल्या महिनाभरात अर्धा डझनहून अधिक दुचाकी चोरीस गेल्या होत्या. पोलिसांनी तालुक्यातून चोरी झालेल्या सहा दुचाकी जप्त केल्या. यामध्ये एमएच ४१ एस ७०१६, एमएच १८ वाय ४६३८, एमएच ४१ एन ७९५५, एमएच ४१ एस १६०६ या चोरीच्या दुचाकी जप्त केल्या, तर कॅम्प परिसरात झालेल्या भुरट्या चोऱ्या व घरफोडीतील लॅपटॉप, संगणक, गॅस सिलिंडरसह इतर लाखोंचा ऐवज भामट्याकडून जप्त करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम भालसिंह यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी. तिगोटे, पोलीस कर्मचारी दिनेश खैरनार, अनिल शेरेकर, राजू सोनवणे, नीलेश तिसगे यांनी कामगिरी बजावली. (वार्ताहर)

Web Title: Mahelagavi seized with the help of six-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.