वणी येथे महायुतीचा आनंदोत्सव
By Admin | Updated: May 17, 2014 00:58 IST2014-05-16T20:07:53+5:302014-05-17T00:58:18+5:30
वणी : महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण हे विक्रमी मतांनी विजयी झाल्याचे वृत्त पोहोचताच वणीत महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून, पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.

वणी येथे महायुतीचा आनंदोत्सव
वणी : महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण हे विक्रमी मतांनी विजयी झाल्याचे वृत्त पोहोचताच वणीत महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून, पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.
चव्हाण यांनी विजयाची हट्ट्रिक करून डॉ. भारती पवार यांचा दणदणीत पराभव केला. आमदार धनराज महाले, तालुका उपाध्यक्ष महेंद्र पारख, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य ॲड. विलास निरगुडे, जगन रताळे, गांगुर्डे, प्रदीप देशमुख, गणेश पैठणे, डॉ. आचार्य, डॉ. एम.टी. जैन, प्रवीण बोरा, प्रमोद भांबेरे, नंदू बागड, सुरेश माळेकर आदि कार्यकर्त्यांनी संपूर्ण गावात ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून पेढे वाटप केले. खासदार चव्हाणांचा विजय ऐतिहासिक असून, मतदारांनी जागृततेने मतदान केल्याने हा विजय मतदारांचा असल्याची प्रतिक्रिया आमदार महाले यांनी व्यक्त केली. खासदारांच्या प्रचार सभेचा प्रारंभ जगदंबेच्या साक्षीने झाल्याने मंदिर परिसरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. (वार्ताहर)