महायुतीचा त्र्यंबकला जल्लोष
By Admin | Updated: May 17, 2014 00:58 IST2014-05-16T21:10:00+5:302014-05-17T00:58:18+5:30
त्र्यंबकेश्वर : लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (शिवसेना) मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुशावर्त चौकात भगवा गुलाल उधळून एकमेकांना गुलाल लावून जल्लोष साजरा केला. विजयी मिरवणूक तथा विजयी रॅली काढण्यास आचारसंहितेमुळे बंदी असल्याने एकाच जागी घोषणा देत जल्लोष करण्यात आला.

पालकमंत्री छगन भुजबळ यांचा एक लाख ८७ हजार ३३६ मतांनी पराभव करून न भूतो न भविष्यती असा दारुण पराभव हेमंत गोडसे यांनी केला. त्र्यंबक शहरातून १२०० मतांच्या आसपास आघाडी मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र तालुक्यातून राष्ट्रवादीला आघाडी मिळाल्याची अधिकृत बातमी आहे. मात्र प्रत्यक्षात आकडा हाती आलेला नाही. अन्य उमेदवारांची तालुक्यात वाताहात झाली.
यावेळी संतोष कदम, छोटू पवार, भूषण अडसरे, विशाल जोशी, शांताराम बागुल, दिलीप सोनवणे, प्रशांत गायधनी, बापू शुक्ल, लक्ष्मीकांत थेटे, कमलेश जोशी, सूरज कदम आदि शिवसेना, भाजपा आणि रिपाइंचे कार्यकर्ते सामील झाले होते. (वार्ताहर)