कुंभमेळ्यात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण सज्ज
By Admin | Updated: November 8, 2014 00:54 IST2014-11-08T00:53:46+5:302014-11-08T00:54:35+5:30
कुंभमेळ्यात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण सज्ज

कुंभमेळ्यात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण सज्ज
नाशिक : कुंभमेळ्यात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण सज्ज झाले असून, त्या अनुषंगाने नाशिकसह त्र्यंबकेश्वर मध्ये विविध विद्युतीकरणाची कामे सुरु झाली आहेत.सिंहस्थासाठी विद्युतीकरण करण्याकरिता शासनाने २४.७९ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. सिंहस्थ काळात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणने ३३/११ केव्ही तपोवन व गणेशवाडी उपकेंद्राची उभारणीची कामे जोमाने सुरु केली आहेत व त्यासाठी लागणाऱ्या ३३ केव्ही उच्च दाबाची १.२ कि.मी. वाहिनीचे काम आता पूर्णत्वास आले असून, ११ केव्ही उच्च दाबाचे एक कि.मी. वीजवाहिनी भूमिगत करणाचे काम पूर्ण झाले आहे.
वाढीव वीजपुरवठ्याची मागणी करण्यासाठी नाशिक येथे सात, तर त्र्यंबकेश्वर येथे १४ नवीन रोहित्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच नाशिक येथील ११ ठिकाणच्या रोहित्रांची क्षमता वाढ करण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. त्र्यंबकेश्वरला सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी खंबाळे उपकेंद्र ते त्र्यंबकेश्वर उपकेंद्र अशी अतिरिक्त १३ कि.मी. उच्चदाब वाहिनी प्रस्तावित असून त्यापैकी २.५ कि.मी. उच्चदाब वाहिनी उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. इगतपुरी तालुक्यातील कावनाई येथेदेखील पोल उभारणे, पर्यायी विद्युतपुरवठा करण्यासाठी ११ केव्ही वाहिनीची उभारणी करण्यात आली आहे. तसेच घोटी उपकेंद्र येथे ब्रेकर व बेची उभारणी करणे, नवीन सिंगल फेज रोहित्राकरिता लघुदाब वाहिनीची व रोहित्राची उभारणी करणे, कंडक्टर बदलवणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहे. सप्तशृंगगडावर नवीन रोहित्रांची उभारणी करणे, भार विभाजित करण्यासाठी नवीन १०० केव्ही क्षमतेचे रोहित्र उभारणी करणे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रोहित्रे सुरक्षित जागी हलविणे इत्यादि कामे पूर्ण झाली आहेत.
सिंहस्थ निधीव्यतिरिक्त महावितरणने शहरी अर्बनायझेशन व मॉडर्नायझेशनची अनेक विद्युतीकरणाची कामे नाशिक व त्र्यंबकेशवर येथे केले आहेत. याशिवाय महावितरणच्या पायाभूत सुविधा योजनाअंतर्गत नाशिक शहर -१ व शहर-२ अंतर्गत एकूण आठ उपकेंद्र प्रस्तावित अूसन, त्याकरिता जागा ताब्यात घेण्याचे काम प्रगती पथावर आहे.सिंहस्थ संदर्भातील सर्व विद्युतीकरणाची कामे मार्च २०१५ पूर्ण करण्याचे महावितरणचे ध्येय असून, त्यादृष्टीने नियोजन महावितरणने केलेले आहे. (प्रतिनिधी)