शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:32 IST

:चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांना नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी सक्षम वीजमीटर बसविण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.

नाशिक :चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांना नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी सक्षम वीजमीटर बसविण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. नादुरु स्त मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप, तर महावितरणला नुकसान सहन करावे लागते. मीटर बंद असणे, तुटलेला डिस्प्ले, नादुरु स्त मीटर या कारणांमुळे ग्राहकांचा अचूक वीज वापर नोंदविला जात नाही. परिणामी बिलासंदर्भात वाद निर्माण होऊन महावितरणला आणि त्यांच्या कर्मचाºयांनाही रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच महावितरणने नियमित आणि अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर दिला आहे. नवीन वीजजोडणी तसेच नादुरु स्त मीटर बदलण्यासाठी महावितरणने पुरेशा प्रमाणात वीजमीटरचा साठा उपलब्ध करून दिला आहे. मीटरची मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन मीटरचे वितरण होत आहे. नाशिक परिमंडळात गेल्या महिनाभरात ८० हजार सिंगल फेजच्या नवीन मीटरमधून ४१ हजार २५६ जुने मीटर बदलण्यात आले. नाशिक शहर मंडळात २२ हजार ७७५, मालेगाव मंडळात ८५९७, तर अहमदनगर मंडळात ९७८४ मीटर बदलण्यात आले आहेत. बदलेल्या मीटरची विभागनिहाय आकडेवारी - नाशिक शहर मंडळ : नाशिक शहर विभाग १- ९४३९, नाशिक शहर विभाग २- ७१२१, नाशिक ग्रामीण- ३८९३, चांदवड- २४२२, मालेगाव मंडळ : मालेगाव- ३२२६, मनमाड- २३०८, सटाणा- १७२८, कळवण- १३३५, अहमदनगर मंडळ : अहमदनगर शहर- २०२५, अहमदनगर ग्रामीण- ५८२, कर्जत- ५८२, श्रीरामपूर- १७६५, संगमनेर- ५१५६ याप्रमाणे वीजमीटर बदलण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक