नाशिकमध्ये लवकरच महाउद्योग गुंतवणूक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST2021-06-23T04:11:19+5:302021-06-23T04:11:19+5:30
नाशिक - गेल्या पंधरा ते वीस वर्षात नाव घ्यावा असा मोठा उद्योग नाशिकमध्ये आला नसला तरी आता ...

नाशिकमध्ये लवकरच महाउद्योग गुंतवणूक करणार
नाशिक - गेल्या पंधरा ते वीस वर्षात नाव घ्यावा असा मोठा उद्योग
नाशिकमध्ये आला नसला तरी आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला कलाटणी देऊ शकेल अशा एका मोठ्या उद्योगाची
गुंतवणूक नाशिक जिल्ह्यात होणे जवळपास निश्चित झाले आहे. दिंडोरी
तालुक्यातील तळेगाव -अक्राळे येथे हा प्रकल्प होेणार आहे. त्यामुळे
नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला चालना मिळू शकेल असा विश्वास महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी व्यक्त
केला आहे.
लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अंबड येथील मुख्य
कार्यालयात आयोजित लोकमत संवाद कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष
बी.बी.चांडक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गवळी यांनी नाशिकच्या
औद्योगिक क्षेत्राची बलस्थाने सांगताना कृषी सधन जिल्हा असल्याने कृषी
आधारित प्रक्रिया उद्योगांना अधिक संधी असल्याचे सांगितले.
नाशिक शहरात सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहत प्रामुख्याने आहे. याठिकाणी
महिंद्रा तसेच बॉश सारख्या कारखान्यांनी नाशिकचे अर्थकारण बदलून टाकले.
असेच मोठे उद्योग नाशिकला यावेत यासाठी प्रयत्न असतात. स्थानिक उद्योजक
आणि नागरिकांनी तशी मागणी वेळोवेळी केली असली तरी गेल्या पंधरा ते वीस
वर्षात असा उद्योग येऊ शकला नाही. परंतु आता दिंडोरी तालुक्यातील तळेगाव
अक्राळे येथे असा प्रकल्प होणे जवळपास निश्चित झाले आहे. सुमारे दीडशे
एकर क्षेत्रात हा प्रकल्प असू शकेल,त्यामुळे अर्थकारण वाढेल आणि
रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील असे सांगून नितीन गवळी यांनी तळेगाव
- अक्राळे येथील औद्योगिक वसाहतीचे महत्त्वही त्यामुळे वाढेल असे सांगितले. दिंडोरी येथील
अक्राळे औद्योगिक वसाहत फार दूर नाही.
उद्योजकांच्या मागणीनुसार या वसाहतीचे दर कमी केले परंतु अपेक्षित
प्रतिसाद मिळालेला नाही. वास्तविक, सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीतील ज्या
उद्योजकांना विस्तार करायचा आहे, त्यांना परवडतील अशा दरात त्याठिकाणी
भूखंड उपलब्ध आहेत. आतापर्यंत या वसाहतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला
नसला तरी यापुढे मात्र निश्चित मिळेल असा विश्वासही गवळी यांनी व्यक्त
केला.
.....इन्फो...
राजूर बहुला येथेही एमआयडीसी
नाशिक शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर राजूर बहुला येथे सुमारे अडीचशे
एकर क्षेत्रात एमआयडीसी होत आहे. मालेगाव येथेही साडे तीनशे एकर
क्षेत्रात वसाहत प्रस्तावित आहे. उद्योगांसाठी उपलब्ध जागा संपली
की,नवीन औद्योगिक क्षेत्राचा विचार सुरू होतो. त्यामुळे लवकरच या नवीन
जागी उद्योग साकारतील असे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.
इन्फो...
गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातही लॉकडाऊन
होते. मात्र, मे महिन्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले आणि सातपूर तसेच
अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योग चक्र सुरू झाले. नाशिकच्या उद्योग
क्षेत्रात परप्रांतीय कामगारांची संख्या कमी असल्याने कोणी कामगार बाहेर
गेले नाही की उद्योग क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम देखील झाला नाही,
असे स्पष्ट करून नितीन गवळी यांनी कोरोना काळात निर्बंध शिथिल झाल्यानंतर
मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिकमधील सत्तर टक्के उद्योग सुरू झाले होते.
अर्थात, उत्पादनाला अपेक्षित मागणी नसल्याने अडचण झाली असेही ते म्हणाले.
--------
प्रशांत खरोटे यांनी फोटो काल डेस्कॅनवर सेव्ह केलेले आहे.