ताहाराबाद विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:39 IST2019-04-11T19:39:25+5:302019-04-11T19:39:44+5:30
ताहाराबाद : येथील मविप्र समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज, ताहाराबाद येथे महात्मा फुले यांची जयंती विविध उपक्र म राबवून साजरी करण्यात आली.

ताहाराबाद विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी
ताहाराबाद : येथील मविप्र समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज, ताहाराबाद येथे महात्मा फुले यांची जयंती विविध उपक्र म राबवून साजरी करण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापक आर. आर. सोनवणे, पर्यवेक्षक आर. डी. खैरनार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर वत्कृत्व स्पर्धाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक सोनवणे, उपशिक्षक जे. जे. भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी डी. एन. बारड, बी. एच. मासूळे, व्ही. डी. जाधव, एम. यु. शेलार, आर. के. सोनवणे, एस. डी. काकुळते, के. बी. जाधव, जी. एल.अहिरे, व्ही. बी. बावा, एम. पी.केदारे, के. यू. बागुल, आर. सी. महाले, पी. एस.गोसावी, राहुल पगार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचलन सुजीत देवरे यांनी तर आभार खैरनार आर. डी. खैरनार यांनी मानले.
(फोटो ११ ताहाराबाद)