संविधान गौरव दिनानिमित्त महारॅली
By Admin | Updated: November 24, 2015 23:57 IST2015-11-24T23:57:12+5:302015-11-24T23:57:41+5:30
संविधान गौरव दिनानिमित्त महारॅली

संविधान गौरव दिनानिमित्त महारॅली
सिडको : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नाशिक व अखिल भारतीय समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव दिनानिमित्त महारॅली व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मोहन अढांगळे, रमेश बनसोड यांनी दिली.
संविधान गौरव दिनानिमित्त रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता संभाजी स्टेडिअम येथून महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध कवी व गायक प्रतापसिंग बोदडे व गायक व प्रबोधनकार नागसेन सौदेकर व कुणाल वराळे प्रस्तुत युगपुरुष हा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम सत्याग्रही भूमी, गंगाघाट, पंचवटी येथे होणार आहे. त्याच प्रमाणे शहरात संविधान गौरव दिनानिमित्त व्यापक जनजागृती मोहिम राबविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश बनसोड, काशीनाथ गवळे, वंदना कोचुरे व मोहन अढांगळे यांनी केले
आहे. (वार्ताहर)