शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये 'इंजिना'ची 'घड्याळा'ला साथ? राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे उमेदवाराची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:26 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 :  विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीमधील संभाव्य लढतींचे चित्र आज स्पष्ट होत आहे.

नाशिक -  विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीमधील संभाव्य लढतींचे चित्र आज स्पष्ट होत आहे. दरम्यान, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवारअशोक मुर्तडक यांनी माघार घेतली आहे.  मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब सानप अशी थेट लढत रंगणार आहे. माघार घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी अशोक मुर्तडक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार माघार घेत असल्याचे सांगितले. ''मनसे ही राज ठाकरेंच्या आदेशावर चालते. मी आदेश पाळला. विधानसभा निवडणुकीसाठी मला आठ दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर झाली होती. अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारीसुद्धा 15-20 दिवसांत होत नाही. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माझी पूर्वतयारी झाली नव्हती. त्यात खर्चाचीही अडचण होती,'' असे मुर्तडक यांनी सांगितले. मात्र पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला मी तयारीनिशी विधानसभेस तयारी करून राजसाहेबांच्या आदेशानुसार रिंगणात उतरणार, असेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, अशोक मुर्तडक यांनी कुठल्याही पक्षाला थेट पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र आपण मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असेही मुर्तडक यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेnashik-east-acनाशिक पूर्वNCPराष्ट्रवादी काँग्रेस