शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra : कोरोना विषाणूच्या Delta व्हेरिअंटनं चिंता वाढवली; केवळ नाशिकमध्येच सापडले ३० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 09:19 IST

Coronavirus Delta Varient : नाशिकमध्ये सापडले कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण. त्यापैकी २८ रुग्ण ग्रामीण क्षेत्रातून.

ठळक मुद्दे नाशिकमध्ये सापडले कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण. २८ रुग्ण ग्रामीण क्षेत्रातून.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला होता. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येत होती. परंतु सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटनं मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. नाशिकमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी पुण्यातही डेल्टा प्लस व्हेरिअंटचे रुग्ण सापडले होते. 

नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे ३० रुग्ण सापडले आहेत. यापैकी २८ हे ग्रामीण भागातील आहे. या लोकांचा रिपोर्ट जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्यानंतर आलेल्या रिपोर्टनुसार या लोकांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.१३५ देशांमध्ये डेल्टा व्हेरिअंटजागितक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १३५ देशांमध्ये तेजीनं पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिअंट सापडला आहे. दरम्यान, पुढील आठवड्यापर्यंत जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० कोटी पर्यंत पोहोचू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. जगभरातील १३२ देशांमध्यये कोरोनाच्या बिटा व्हेरिअंटचे रुग्ण सापडले आहेत, तर ८१ देशांमध्ये गॅमा व्हेरिअंटच्या केसेस समोर आल्या आहेत. १८२ देशांमध्ये अल्फा व्हेरिअंटच्या चक १३५ देशांमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण सापडले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकhospitalहॉस्पिटल