नाशिकचा मुर्तझा महाराष्ट्राचा कर्णधार
By Admin | Updated: October 3, 2014 23:05 IST2014-10-03T23:05:20+5:302014-10-03T23:05:35+5:30
१९ वर्षांखालील क्रिकेट संघ रवाना

नाशिकचा मुर्तझा महाराष्ट्राचा कर्णधार
नाशिक : विनू मंकड चषकासाठी १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी नाशिकच्या मुर्तझा ट्रंकवाला याची निवड झाली आहे़ बडोदा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ काल रवाना झाला़ मुर्तझा ट्रंकवाला याने मागील वर्षीही या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते़ यामध्ये कर्णधाराला शोभेल अशी चमकदार कामगिरी करत या जोरावर बीबीसीआयच्या स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघात स्थान मिळवले होते़ संभाव्य भारतीय संघाच्या शिबिरासाठी त्याची निवड झाली होती़ चालू मोसमात त्याने नाशिक संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करत राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे़ यावर्षीच्या विनू मंकड चषकाच्या स्पर्धा बडोदा येथे होत आहेत़ यामध्ये महाराष्ट्रासह बडोदा, गुजरात, मुंबई, सौराष्ट्र या संघांचा समावेश आहे़ महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नाशिकचेच शेखर घोष व शेखर गवळी यांची निवड झाली आहे़