महाराष्टÑ संतांची भूमी : संगमनेरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:57 IST2020-02-12T21:43:20+5:302020-02-12T23:57:04+5:30
कृष्ण भगवानला भक्त पुंडलिकासाठी पंढरपुरात यावे लागले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे अनेकवेळा देवदेवतांनी अवतार घेतला आहे. परमेश्वर आपल्यालाही भेटेल, पण त्यासाठी आपणही आई-वडिलांची पुंडलिकासारखी सेवा केली पाहिजे, असा हितोपदेश युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव संगमनेरकर यांनी केला.

दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे अखंड नाम सप्ताह सांगताप्रसंगी कीर्तन करताना योगेश महाराज संगमनेरकर.
मुळाणे : कृष्ण भगवानला भक्त पुंडलिकासाठी पंढरपुरात यावे लागले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे अनेकवेळा देवदेवतांनी अवतार घेतला आहे. परमेश्वर आपल्यालाही भेटेल, पण त्यासाठी आपणही आई-वडिलांची पुंडलिकासारखी सेवा केली पाहिजे, असा हितोपदेश युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव संगमनेरकर यांनी केला.
आदिवासीबहुल दिंडोरी तालुक्यातील व्यसनमुक्तीचे धडे देण्यात येत आहे. या अंतर्गत मुळाणे गावात गेल्या पाच वर्षांपासून कीर्तन महोत्सव साजरा करण्यात येतो. योगेश महाराज यांच्या कीर्तनाने यंदाच्या सप्ताहाची सांगता झाली. यावेळी सागर दिंडे, जयश्री तिकडे, संग्राम भंडारे आदी उपस्थित होते.