कारागृहात बंदीजनांसाठी महारूद्र पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:34 IST2017-08-06T01:34:41+5:302017-08-06T01:34:55+5:30
श्रीश्री रविशंकर आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वैदिक धर्म संस्थानतर्फे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी रूद्र महापूजा उत्साहात पार पडली.

कारागृहात बंदीजनांसाठी महारूद्र पूजा
नाशिक : श्रीश्री रविशंकर आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वैदिक धर्म संस्थानतर्फे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी रूद्र महापूजा उत्साहात पार पडली.
कारागृहात श्रावणमासनिमित्त पहिल्यांदाच व कैद्यांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी याकरिता श्रीश्री रविशंकर आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने गुरुवारी रुद्र महापूजा आयोजित करण्यात आली होती. बंगळुरूहून आलेले स्वामीजी व पंडित यांच्या पौराहित्याखाली कारागृहात रुद्र महापूजा करण्यात आली. यावेळी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर, प्रमोद वाघ, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, खंडू गांगुर्डे, अशोक गवळी, संजय पिंगळे, स्वागत देव्हारे, सचिन म्हसने, ऋषिकेश कुलकर्णी, योगेश देवरे आदि उपस्थित होते.