येवला : प्रती पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यातील कोटमगाव बु॥ येथील श्री विठ्ठल मंदिरात राजेंद्र काकळीज, अरुण धनगे यांच्या हस्ते सप्तनिक महापूजा करण्यात आली.परंपरेप्रमाणे मंदिरात विठ्ठलाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गणपत ढमाले, पंढरीनाथ पाटील, सोपान ढमाले, तुळशीराम कोटमे, भागवत मोरे, सरपंच सोनाली कोटमे, अंजना नरवडे, संजय नरवडे, रामेश्वर तांदळे, भूषण बिलोरे, ग्रामसेविका सुजाता परदेशी उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मात्र मंदिर यंदाही बंद राहिले. तर आषाढी एकादशी निमित्ताने होणारा यात्रोत्सव यावर्षीही रद्द करण्यात आल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे उत्पन्न बुडाले आहे, तर भाविकांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, परिसरातील काही भाविकांनी मंदिर परिसरात येऊन कळसाचे वा बंद दरवाज्यातील विठूमाउलींचे दर्शन घेतले. (२० येवला ३)
कोटमगावच्या विठ्ठल मंदिरात महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:46 IST
येवला : प्रती पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यातील कोटमगाव बु॥ येथील श्री विठ्ठल मंदिरात राजेंद्र काकळीज, अरुण धनगे यांच्या हस्ते सप्तनिक महापूजा करण्यात आली.
कोटमगावच्या विठ्ठल मंदिरात महापूजा
ठळक मुद्देपरंपरेप्रमाणे मंदिरात विठ्ठलाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली.