नाशिकच्या गायिकेची महालक्ष्मीचरणी गानसेवा

By Admin | Updated: September 27, 2014 00:29 IST2014-09-27T00:29:20+5:302014-09-27T00:29:40+5:30

नाशिकच्या गायिकेची महालक्ष्मीचरणी गानसेवा

Mahalakshmicharan Ganseva of Nashik's song | नाशिकच्या गायिकेची महालक्ष्मीचरणी गानसेवा

नाशिकच्या गायिकेची महालक्ष्मीचरणी गानसेवा

नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या चरणी नाशिकच्या पार्श्वगायिका मीना परुळकर-निकम या आपली गानसेवा रुजू करणार आहेत. येत्या शनिवारी (दि. २७) कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ७ वाजता ही गानमैफल रंगणार आहे. मीना परुळकर-निकम या ‘जागर श्री महालक्ष्मीचा’ हा हिंदी व मराठी भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करणार असून, संगीत संयोजन नाशिकचेच अमोल पाळेकर करणार आहेत. यावेळी पियू आरोळे निवेदन करणार आहेत. मीना परुळकर-निकम यांनी मागील वर्षी सप्तशृंगगडावरही गानसेवा रुजू केली होती.

Web Title: Mahalakshmicharan Ganseva of Nashik's song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.