दूषित व गढूळ पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरपरिषद लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या. मात्र, लोकप्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासनाने याबाबीकडे लक्ष दिले नाही. म्हणून पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरातील भगवा चौक, लोणारी गल्ली येथे एका दगडाला दुग्ध महाअभिषेक आंदोलन केले.यावेळी शिवसेनेचे शहर संघटक राहुल लोणारी, तालुका समन्वयक धिरजसिंग परदेशी, गणेश वडनेरे, राष्ट्रवादीचे सचिन सोनवणे, काँग्रेसचे अमित मेहता, अतुलशेठ घट, शांताराम राजपूत, दीपक काथवटे, विष्णू निकम, संजय कहार, मोहन जाधव, गणेश पाटील आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
येवला शहरात दगडाला महादुग्ध अभिषेक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:55 IST
येवला : शहरात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दगडाला महादुग्ध अभिषेक आंदोलन केले.
येवला शहरात दगडाला महादुग्ध अभिषेक आंदोलन
ठळक मुद्दे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप