स्वातंत्र्यासाठी बलोपासक घडवणारे महाबळ गुरुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:01+5:302021-08-15T04:17:01+5:30
त्या काळी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची मित्र समाज संघटना स्थापन झाल्यानंतर ना. दा. सावरकर, दत्तोपंत केतकर, श्रीधरपंत वर्तक यांच्यात वावरणारे ...

स्वातंत्र्यासाठी बलोपासक घडवणारे महाबळ गुरुजी
त्या काळी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची मित्र समाज संघटना स्थापन झाल्यानंतर ना. दा. सावरकर, दत्तोपंत केतकर, श्रीधरपंत वर्तक
यांच्यात वावरणारे महाबळ गुरुजी हे शारीरिक शिक्षण प्रमुख होते. ते अभिनव भारतचे शपथबद्ध सदस्य होते.
नाशिकमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अध्यापकाचे शिक्षण घेण्यासाठी ते
पुणे येथे गेले आणि तेथे त्यांनी अभिनव भारतची शाखा स्थापन केली.
त्यांच्या मध्यस्थीनेच १९०८ मध्ये लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी
इब्राहिम मिया हे नाशिकमध्ये
आले आणि चळवळीत काम करणाऱ्या युवकांना लष्करी शिक्षण देऊ लागले. त्यांनी
गोदाकाठी यशवंत व्यायामशाळा सुरू केली. पुरामुळे नंतर ती शहरात
आणण्यात आली आणि १०५ वर्षांनंतर आजही ही संस्था कार्यरत आहे.
१९०९ बाबाराव सावरकरांनी कवी गोविंदांची रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले
ही कविता प्रसिध्द केली. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात
आला. त्यावेळी रातोरात भगूर येथे सावरकरांच्या घरी जाऊन या संदर्भातील कागदपत्रे, पुरावे नष्ट
करण्याची जोखीमपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली होती. अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध
केल्यानंतर कटाशी थेट संबंध नसला तरी महाबळ गुरुजी यांना शासकीय सेवेतून शिक्षक म्हणून बडतर्फ
करण्यात आले. त्यानंतर कवी गोविंद यांची स्वातंत्र्यपदे प्रकाशित
करण्याची कामगिरी त्यांनी केली. निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या महाबळ
गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम केले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून शासकीय सन्मानही नाकारले, असे त्यांचे नातू रघुनाथ महाबळ यांनी सांगितले.
छायाचित्र आहेत...