नाशिक जिल्हा परिषदेत ‘महा’ आघाडी
By Admin | Updated: October 6, 2014 00:15 IST2014-10-04T22:59:55+5:302014-10-06T00:15:51+5:30
अहेर, थोरे, बच्छाव आणि डोखळेंची सभापतिपदी निवड

नाशिक जिल्हा परिषदेत ‘महा’ आघाडी
नाशिक : दिवसागणिक बदलणाऱ्या नाट्यमय घडामोडींनंतर शनिवारी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत आश्चर्यकारकरीत्या शिवसेना-राष्ट्रवादी व भाजपा यांनी आघाडी केली. या महाआघाडीमुळे राष्ट्रवादीच्या उषा बच्छाव यांची समाजकल्याण समिती सभापतिपदासाठी, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी शिवसेनेच्या शोभा डोखळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अन्य दोन विषय समिती सभापतिपदी केदा अहेर व किरण थोरे यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, कॉँग्रेसने या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवत शेवटच्या क्षणी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, तर अगदी शेवटच्या क्षणी शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाऊन एक पद घेण्याचा निर्णय घेतला.