शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

अत्याधुनिक उपकरणांचा महाकुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:44 IST

फॉर्म्युला स्टुडंट कार, दुचाकीची ऊर्जा वाचवणारी प्रणाली, मटेरियल हॅँडलिंग युनिट, पिझे इलेक्ट्रिक क्रिस्टल, व्हॅन डे ग्राफ जनरेटर, वॉटर इरिगेशन सिस्टीम, व्हॉट्सअ‍ॅप कंट्रोल, होम सिक्युरिटी अशा वैविध्यपूर्ण विज्ञान उपकरणांची मांडणी, प्रत्येक उपकरणाची तितक्याच तन्मयतेने दिली जाणारी माहिती, विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करत आपल्या ज्ञानात भर घालण्यास उत्सुक प्रेक्षक असे विज्ञानमय वातावरण सध्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात अनुभवयास मिळत आहे.

नाशिक : फॉर्म्युला स्टुडंट कार, दुचाकीची ऊर्जा वाचवणारी प्रणाली, मटेरियल हॅँडलिंग युनिट, पिझे इलेक्ट्रिक क्रिस्टल, व्हॅन डे ग्राफ जनरेटर, वॉटर इरिगेशन सिस्टीम, व्हॉट्सअ‍ॅप कंट्रोल, होम सिक्युरिटी अशा वैविध्यपूर्ण विज्ञान उपकरणांची मांडणी, प्रत्येक उपकरणाची तितक्याच तन्मयतेने दिली जाणारी माहिती, विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करत आपल्या ज्ञानात भर घालण्यास उत्सुक प्रेक्षक असे विज्ञानमय वातावरण सध्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात अनुभवयास मिळत आहे. निमित्त आहे सुवर्णमहोत्सवी उपक्रमांतर्गत आयोजित ‘आय राईज’ विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनाचे. शुक्रवारी (दि. १६) सकाळी या विज्ञान प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ झाला असून, १९ फेब्रुवारीपर्यंत ते नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे.  संस्थेच्या अभियांत्रिकी, आर. वाय. के. विज्ञान, एस. एम. आर. के. महिला महाविद्यालय यांच्या विविध विभागांचा सहभाग या प्रदर्शनात आहे. प्रदर्शनात एकाहून एक सरस उपकरणे, यंत्रणा सादर करण्यात आल्या असून, विज्ञानाच्या साहाय्यानेच रोजच्या जीवनात निर्माण झालेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्याचे फॉर्म्युले विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. यातील काही उपकरणांनी निरनिराळी पारितोषिकेही मिळवली असून, घरगुती उपयोगापासून कंपनी, अंतराळयानापर्यंत ठिकठिकाणी वापरता येणाºया उपयुक्त गोष्टी येथे पाहायला मिळत आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मेकॅनिकल शाखेतील तृतीय व चौथ्या वर्षातील २५ विद्यार्थ्यांनी ही कार तयार केली आहे. डिझाइनपासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही देशी असणारी ही कार कॉलेजमध्येच तयार झाली आहे. दिल्ली येथे भरलेल्या ‘सुप्रा’ प्रदर्शनात या मॉडेलने ६३ रॅँकवर मानाचे स्थानही पटकावले आहे.थम्बो इलेक्ट्रिक जनरेटरअ‍ॅल्युमिनीअमच्या आठ प्लेट बसवून हे ‘थम्बो इलेक्ट्रिक जनरेटर फॉर एक्झॉस्ट सिस्टीम’ तयार करण्यात आले आहे. यामुळे वाहनातील इंधनावरची पॉवर कमी करून ती बॅटरीला दिली जाते. यातून मोबाइलदेखील चार्ज होऊ शकतो. शिवाय गाडीचे मागचे, पुढचे लाइटही पूर्ण क्षमतेने चालतात. हॅँडल बार हिट करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. यातून पहिल्याच प्रयत्नात १३.५ ते १४ व्होल्टची ऊर्जा मिळविण्यात यश आले आहे. अजय काजळे, आदित्य काकडे, रोहन कुलकर्णी, वैभव भालेराव या चौघांनी हे मॉडेल तयार केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक