मॅग्नम हार्टतर्फे हृदयरोगावर चर्चासत्र
By Admin | Updated: October 9, 2014 01:57 IST2014-10-09T00:59:09+5:302014-10-09T01:57:19+5:30
मॅग्नम हार्टतर्फे हृदयरोगावर चर्चासत्र

मॅग्नम हार्टतर्फे हृदयरोगावर चर्चासत्र
नाशिक : देशात वाढत चाललेल्या हृदयविकाराबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘आपल्या हृदयाचं ऐका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे़ येत्या रविवारी (दि़ १२) सकाळी १० वाजता कालिदास कलामंदिरामध्ये होणाऱ्या या चर्चासत्रात पुणे येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ़ जगदीश हिरेमठ, योग विशेषज्ञ डॉ़ मनोज नाईक सहभागी होणार असल्याची माहिती मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ़ मनोज चोपडा यांनी पत्रकार परिषदेत दिली़ जागतिक हृदयरोग दिनानिमित्त आयोजित या चर्चासत्रामध्ये हृदयरोगाबाबत असलेले समज-गैरसमज, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता तसेच निरोगी हृदयासाठी घ्यावयाची काळजी यावर तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार असून, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)