तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावर जैन भाविकांसाठी मांगीतुंगी फाट्यावर ऋ षिभगरी डाक शाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:31 IST2018-01-01T00:29:53+5:302018-01-01T00:31:35+5:30
सटाणा : तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावरील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने नुकतेच ऋषिभगरी नावाने डाकघर सुरू करण्यात आले.

तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावर जैन भाविकांसाठी मांगीतुंगी फाट्यावर ऋ षिभगरी डाक शाखा
सटाणा : तालुक्यातील मांगीतुंगी फाट्यावरील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने नुकतेच ऋषिभगरी नावाने डाकघर सुरू करण्यात आले. या डाकघरचा शुभारंभ गनिनी प्रमुख ज्ञानमती माता यांच्या हस्ते करण्यात आला.
जैन तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगी येथे देशभरातून हजारो भाविक हजेरी लावतात. येथील धर्मशाळेत भाविक चार चार महिने मुक्कामाला असतात. भाविकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता यावा तसेच मनीआॅर्डरची सोय व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून डाक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होती. याची दखल घेत मांगीतुंगी फाट्यावरील भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण समितीच्या कार्यालयात भारतीय डाक विभागाने डाक शाखेला मान्यता दिली. ऋषिभगरी नावाने डाक शाखा सुरू केल्याने डाक अधिकारी शोभा मधाळ, मालेगाव विभागप्रमुख एल.व्ही. सूर्यवंशी यांचा ज्ञानमती माता यांच्या हस्ते भगवान ऋषभदेव यांची प्रतिमा देऊन सन्मान केला. कार्यक्रमास पीठाधिश रवींद्र कीर्ती स्वामी, मांगीतुंगीचे सरपंच बाळू पवार, दसवेलचे उपसरपंच राजेंद्र निकम, जीवनप्रकाश जैन, सी.आर. पाटील सुरेश जैन, प्रदीप जैन सटाणावाला, चिरंजीलाल कासलीवाल आदी उपस्थित होते.