माधवराव पहिलवान क्रि डा महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 06:07 PM2019-12-25T18:07:28+5:302019-12-25T18:08:33+5:30

कसबे सुकेण : येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ व सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव (पहिलवान )जाधव कबड्डी चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

Madhavrao Pahlawan Kriya Da Festival celebrates with enthusiasm | माधवराव पहिलवान क्रि डा महोत्सव उत्साहात

कसबे-सुकेणे येथील माधवराव पहिलवान क्रि डा महोत्सवात कबड्डीचे प्रथम पारीतोषिक आडगाव संघाला देतांना बाळासाहेब जाधव समवेत भाऊराज उगले, खसंग्राम मोगल, अक्षय घुगे, शरद जाधव आदी.

Next
ठळक मुद्देकसबे सुकेणे : कबड्डीत आडगावच्या ब्रम्हा स्पोर्टस्ने मारली बाजी

कसबे सुकेण : येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ व सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव (पहिलवान )जाधव कबड्डी चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
कबड्डीचा अंतिम सामना पुरु ष गटात ब्रह्मा स्पोर्ट्स, आडगाव विरु द्ध नाशिक ग्रामीण पोलीस यांच्यात झाला. या स्पर्धेत ब्रह्मा स्पोर्ट्स ने बाजी मारत ११११११ रु पयांचे पारितोषिक पटकावले. नाशिक ग्रामीण पोलिसांना ७१११ रूपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. तर तृतीय पारितोषिक क्रि डा प्रबोधिनी, नाशिक यांना प्राप्त झाले. पुरु ष गटामध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले.
महिला गटात क्रि डा प्रबोधनी नासिक गटाने शिवशक्ती आडगाव गटाचा पराभव केला. महिला कबड्डी स्पर्धेत तृतीय क्र मांक रचना क्र ीडा मंडळ, नाशिकला तर चौथा क्र मांक रु द्र शंभू क्र ीडा मंडळ, ओझर यांना प्राप्त झाला. महिला गटात एकूण १० संघांनी सहभाग नोंदवला. कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू ,उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई करणाऱ्या खेळाडूंना देखील गौरवण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रमुख आयोजक बाळासाहेब जाधव, अनिल जाधव, छगन जाधव, चिंतामण जाधव, विजय जाधव यांनी प्रयत्न केले.

Web Title: Madhavrao Pahlawan Kriya Da Festival celebrates with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.