मातुलठाणच्या सरपंचपदी नागरे
By Admin | Updated: January 7, 2017 00:53 IST2017-01-07T00:53:17+5:302017-01-07T00:53:29+5:30
बिनविरोध निवड : उपसरपंच म्हणून रामदास कातुरे

मातुलठाणच्या सरपंचपदी नागरे
नगरसूल : तालुक्यातील मातुलठाणच्या सरपंचपदी लीलाबाई अरु ण नागरे यांची, तर उपसरपंच म्हणून रामदास रायभान कातुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आवर्तन पद्धतीने विद्यमान सरपंच श्रीमती अहेर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी मातुलठाण ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंचपदासाठी लीलाबाई अरुण नागरे यांचा, तर उपसरपंचपदासाठी रामदास कातुरे यांचे एकएकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पगारे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा पॅनलचे नेते साहेबराव अहेर, अरु ण नागरे, लक्ष्मण सुरासे, भावराव नागरे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी अशोक मुंढे, राजू मोरे, गोरख घुगे, छगन कातुरे, कारभारी लहरे, जनार्दन साबळे, रामकृष्ण नागरे, विलास नागरे, संतोष नागरे, पोपट नागरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूककामी तलाठी वाघ, एम. एन, पिंपळसे, ग्रामसेवक गवळी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)