एम. एस. कोठारी अकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By Admin | Updated: July 3, 2014 00:07 IST2014-07-02T22:28:16+5:302014-07-03T00:07:56+5:30

एम. एस. कोठारी अकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

M. S. Honorable students of Kothari Academy felicitate | एम. एस. कोठारी अकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एम. एस. कोठारी अकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित एम. एस. कोठारी अकॅडमीत दहावी परीक्षेत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेत सर्वप्रथम आलेला विद्यार्थी अभिषेक देशमुख याच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्यवाह शशांक मदाने यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा संदेश पाठविले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: M. S. Honorable students of Kothari Academy felicitate