म्हसरूळला साडेसात लाखांची चंदनाची लाकडे जप्त : टोळीचा पर्दाफाश
By Admin | Updated: May 27, 2017 22:54 IST2017-05-27T22:54:42+5:302017-05-27T22:54:42+5:30
म्हसरूळ परिसरातील सुमारे २५ चंदनाची झाडे तोडून त्यातील सुवासिक गाभ्याची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले
म्हसरूळला साडेसात लाखांची चंदनाची लाकडे जप्त : टोळीचा पर्दाफाश
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : म्हसरूळ परिसरातील सुमारे २५ चंदनाची झाडे तोडून त्यातील सुवासिक गाभ्याची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे़ या टोळीतील सुरज मधूकर दाभाडे (रा.घर नं.४२६८,काळाराम मंदिर,उत्तरदरवाजा) या संशयितास पोलिसांनी पाठलाग करून पकडले असून त्याचे उर्वरीत साथीदार फरार झाले आहेत़ दरम्यान या चोरट्यांकडून दोन दुचाकींसह सुमारे साडेसात लाख रुपयांचे चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली आहेत़
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे बिट मार्शल टेमगर व भोये हे वरंवरडी रोडने गस्त घालीत होते़ त्यांना म्हसरूळ शिवारातील वाघाडी नदीकडे जाणाऱ्या नाल्याच्या कडेला चंदनाच्या झाडाच्या लाकडे आढळून आली. आपले वाहन रस्त्यावर लावून हे दोघे नाल्यातील पाय वाटेने पुढे गेले असता तीन - चार संशयित युवक कटरच्या साहाय्याने चंदनाचा सुवासिक गाभा काढत होते़ या संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी आपल्या दुचाकी सोडून पळ काढला़.पोलिसांनी या चंदन चोरट्यांचा पाठलाग करून सूरज दाभाडे यास पकडले तर त्याचे साथीदार फरार झाले़ पोलिसांनी या ठिकाणावरून दोन पल्सर दुचाकींसह (एमएच १५ एफएस ०६२७, एमएच १५ बीएफ २४२३) सुमारे साडेसहा लाख रुपयांचे पोत्यात भरलेले चंदनाची लाकडे आढळून आली़.