शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्प परिसरातील घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:19 IST

नाशिक : घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पच्या आनंदरोड येथे घडली आहे़

ठळक मुद्देघरफोडीचा गुन्हा दाखल

नाशिक : घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पच्या आनंदरोड येथे घडली आहे़

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कचरू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंदरोडवरील गॅस गोडाऊनच्या बाजूला असलेल्या मोहन मनवाणी यांच्या बंगल्यावर ते राहतात. रविवारी (दि़७) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कुलूप लावलेली कडी तोडून घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील ५० हजार रुपये रोख, १८ हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत असा ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़  याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

नाशिकरोडला विवाहितेचा छळनाशिक : भाजी करता येत नाही, घरातील कामे व्यवस्थित करता येत नाही, आई-वडिलांनी विवाहात मोठ्या वस्तू दिल्या नाहीत, तसेच मुलांना शाळेत टाकण्यासाठी माहेरून पैसे आण या कारणावरून पतीसह सासरकडील मंडळी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची तक्रार विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़ विवाहितेच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी पती स्वप्नील शांताराम ताजणे, नंदिनी शांताराम ताजणे (सासू), पल्लवी रवि गिते (नणंद, सर्व राहणार पाडूरंग निवास, सौभाग्यनगर, नाशिकरोड) याच्याविरोधात विवाहिता छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सिडकोत एकावर वारनाशिक : भावास मारहाण का केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकास दोघा संशयितांनी बेदम मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना रविवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास सिडकोतील पंडितनगर नाल्याजवळ घडली़ छकुल्या गायकवाड व अनिल मोरे असे मारहाण करणाऱ्या संशयिताचे नाव आहे़ याप्रकरणी अक्षय साळवे या युवकाच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे़

कारमधून तलवार जप्तनाशिक : सिडकोतील लेखानगर बसथांब्यासमोर उभ्या असलेल्या डिझायर कारच्या डिक्कीतून (एमएच १५ ईबी ३५५५) अंबड पोलिसांनी सोमवारी (दि़८) दुपारी अडीच फुटाची तलवार जप्त केली़ याप्रकरणी कारचालक सचिन कारभारी थापेकर (रा़ गौळाणेनगर, नाशिक) विरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजले नसून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

नाशिकरोडला तरुणाची आत्महत्यानाशिक : घरातील सिलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास नाशिक-पुणे रोडवरील शिवाजीनगरमध्ये घडली़ अक्षय रमेश फड (२५, रा़ साई अपार्टमेंट, दत्तमंदिर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

अल्पवयीन मुलीचे अपहरणनाशिक : भारतनगर परिसरातील अल्पवयीन मुलीचे वडाळागावातून अपहरण करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी अपहृत मुलीच्या काकाच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक