तळोघ येथे प्रेमी युगुलाची आत्महत्या

By Admin | Updated: July 23, 2016 22:33 IST2016-07-23T22:33:41+5:302016-07-23T22:33:41+5:30

तळोघ येथे प्रेमी युगुलाची आत्महत्या

Luigi Yugula's suicide at Talgh | तळोघ येथे प्रेमी युगुलाची आत्महत्या

तळोघ येथे प्रेमी युगुलाची आत्महत्या

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथील प्रेमीयुगुलाने फेट्याच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार घोटी जवळील तळोघ गावातील मंगल हरी गोईकणे (१६) व प्रविण कीसन कडु (२२) यांनी दुपारी दिड वाजेच्या सुमारास प्रवीणच्या राहात्या घरातील खोलीत आडव्या खांबाला फेट्याच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीची शोधाशोध सुरु असतांना मुलाचे घर आतुन बंद अवस्थेत आढळले भरपुर आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर काही जणांनी घरावर चढुन छतावरील कौले काढुन आत प्रवेश मिळविला असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. दरम्यान या दोघाच्या अंगावर चाकुने वार असल्याचे आढळले ़ अधिक तपास पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे़
सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, उपनिरीक्षक सुभाष पाटील, गणेश वराडे, अशोक भाबड पी. एन. गंगावणे, पी. एन. गांगुडें, एच. सी. बोराडे आदी करत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Luigi Yugula's suicide at Talgh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.