शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

किमान तपमान ९.६ : पारा सातत्याने घटतोय; आरोग्याची घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:10 IST

संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा जाणवण्यास सुरूवात होते तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात थंडी जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे.

ठळक मुद्दे मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी सर्वाधिक नीचांकी ७.६ अंशयावर्षी थंडीचा जोर अधिक बुधवारी ९.६ इतके किमान तपमान नोंदविले

नाशिक : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी मंगळवारी (दि.११) ९.४अंश इतके नोंदविले गेले. आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरिक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तपमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्याती सर्वाधिक कमी ८.८ अंश इतक्या किमान तपमानाची नोंद झाली. त्यामुळे थंडीच्या वाढत्या कडाक्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. शहरात किमान तपमान १२.८ तर कमाल तपमानाचा पारा थेट २८.२ अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे. मागील काही दिवसांपासून किमान तपमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीची तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. गेल्या शनिवारी (दि.१) शहरात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवला. त्यादिवशी कमाल तपमानाचा पारा २६.१ अंशापर्यंत तर कि मान तपमान ११.२ अंशापर्यंत घसरला होता; मात्र मंगळवारपासून किमान तपमानाचा पारा त्यापेक्षाही अधिक खाली घसरू लागल्याने थंडीने शहर गारठले आहे. मंगळवारी ९.४, बुधवारी ९.६ इतके किमान तपमान नोंदविले गेले.

एकूणच थंडीचा कडाका वाढताच नाशिककरांनी उबदार कपड्यांच्या वापरावर भर देण्यास सुरूवात केली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक चहा, कॉफीला पसंती देत आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा जाणवण्यास सुरूवात होते तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात थंडी जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. किमान तपमानाचा पारा कमी झाल्यामुळे कमाल तपमानदेखील तीशीच्या खाली सरकले आहे. मुंबईच्या हवामान खात्याने दोन दिवस नाशिकमध्ये थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या हंगामात ९.२ ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली आहे.

गतवर्षापेक्षा यंदा थंडीचा जोर अधिकगेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा जोर अधिक असल्याचे हवामान खात्याकडील नोंदींवरून स्पष्ट होते. यांदा पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र अधिक असल्याचे जाणवत आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ९, १०, ११, १२ या तारखांना अनुक्रमे किमान तपमान १५.२ / १५.४ / १४.०० / १३.२ अंश इतके नोंदविले गेले होते. मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी सर्वाधिक नीचांकी ७.६ अंशापर्यंत किमान तपमानाची नोंद झाली होती. यावर्षी या तारखांना अनुक्रमे ११.३ / १२.८ / ९.४ / ९.६ इतके किमान तपमान नोंदविले गेले आहे.

महत्त्वाच्या शहरांमधील किमान तपमान असे...पुणे : ९.५अहमदनगर ९.२जळगाव १०.४महाबळेश्वर १३.५मालेगाव १२.२नाशिक : ९.६सातारा : ९.४औरंगाबाद १०.४अकोला : १३.५

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकTemperatureतापमान