शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कमी दाबाने मिळतेय आवर्तनाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:41 IST

मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाई :मनमाडकरांचा दुष्काळात तेरावा महिना !

मनमाड: मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. सव्वा लाख लोकसंखेच्या मनमाड शहराची तहान भागवणारा पाटोदा साठवणूक तलाव पुर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.मनमाड शहरासाठी पालखेड धरणाच्या पाण्याचे आवर्तन १ मार्च रोजी सोडले जाणार होते.मात्र काही तांत्रीक अडचणींमुळे हा कालावधी लांबत जाउन पिण्याच्या पाण्याचे रोटेशन दहा ते बारा दिवस उशीराने सोडण्यात आले .पालखेड धरणातून कॅनाल द्वारे निघालेले पाणी गुरूवारी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाटोदा येथील साठवण तलावात आवर्तण सोडल्यानंतर तब्बल पाच दिवसांच्या विलंबाने पोहचले.मात्र हे पाणी पुर्ण क्षमतेने व पुर्ण दाबाने पोहचत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.पाटबंधारे प्रशासनाने चार पंपाचे पाणी सुरू ठेवावे आणि पाटोदा साठवणुक तलाव भरून द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी दिला आहे.शहराची गंभीर पाणी टंचाई लक्षात घेता ४० द.ल.घ.फु. पाणी मिळणे अपेक्षीत आहे.हे पाणी पुढील रोटेशन मिळेपर्यंत म्हणजे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.पालीकेच्या शिष्टमंळडळाने पाटोदा साठवण तलावावर भेट देउन पहाणी केली. या वेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते अलताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे,विजय मिश्रा, गालीब शेख, पापा थॉमस, बब्बू कुरेशी,स्वराज देशमुख आदी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाडकरांना गेल्या काही महिन्यांपुर्वी दहा ते बारा दिवसाआड होणाºया पाणी पुरवठ्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या पाणीपुरवठ्याच्या दिवसांमधे वाढ होत जाउन तो कालावधी आज २० दिवसांच्या वर जाउन पोहचला आहे. त्यातच आवर्तण सुटण्यास झालेला विलंब व आता कमी दाबाने मिळणारे आवर्तणाचे पाणी या मुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी