नाशकात पुन्हा नीचांकी तपमान
By Admin | Updated: December 18, 2015 00:08 IST2015-12-18T00:01:47+5:302015-12-18T00:08:08+5:30
नाशकात पुन्हा नीचांकी तपमान

नाशकात पुन्हा नीचांकी तपमान
नाशिक : गुरुवारी नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा राज्यातील नीचांकी तपमानाची (१२.४ अंश सेल्सिअस) नोंद करण्यात आली. नैऋत्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही दिवसांपासून शहरातून थंडी जवळपास गायब झाली होती. मात्र आता पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरू लागला आहे. बुधवारच्या १५ अंश सेल्सिअसवरून गुरुवारी शहराचे किमान तपमान १२.४ अंशांपर्यंत घसरले.