कमी दाबाने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST2021-06-21T04:11:24+5:302021-06-21T04:11:24+5:30
रिक्षाचालकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी अद्याप प्रत्यक्ष शाळा भरत नसल्याने विद्यार्थी ...

कमी दाबाने पाणीपुरवठा
रिक्षाचालकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा
नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी अद्याप प्रत्यक्ष शाळा भरत नसल्याने विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने या रिक्षाचालकांना पर्यायी व्यवसायाचा शोध घ्यावा लागत आहे. पालकांप्रमाणेच रिक्षाचालकांनाही शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
सकाळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली
नाशिक : निर्बंध शिथिल झाल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. शहरातील वेगवेगळ्या जॉगिंग ट्रॅकवर गर्दी होऊ लागली आहे. निर्बंधांमुळे अनेकांना फिरायला जाणेही कठीण झाले होते.
त्र्यंबक परिसरात पर्यटकांना बंदी
नाशिक : पावसामुळे निसर्ग बहरू लागला असला तरी निसर्गप्रेमींना अद्याप याचा आनंद घेता येत नाही. पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
इच्छुकांकडून मनपा निवडणुकीची तयारी
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांची अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. किंवा समाजमाध्यमांचा वापर करून मतदारांच्या संपर्कात राहाण्याबरोबरच नवीन भागात कार्यकर्ते जुळविण्यावर भर दिला जात आहे.
पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
नाशिक : जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली असली तरी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने अद्याप पेरण्यांना वेग आलेला नाही. काही तालुक्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी गावोगावच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, या रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण झाले आहे. वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.