शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

लग्नाच्या सततच्या तगाद्यामुळे प्रियकराकडून प्रेयसीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 19:13 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्तेच्या दरेवाडी येथे प्रेयसीकडून लग्नासाठी कायम तगादा होत असल्याने वैतागलेल्या प्रियकराने प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या केली. हा खून चुलत्याच्या मदतीने केल्याची केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित प्रियकर व त्याच्या चुलत्याला घोटी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देसंशयित प्रियकर व त्याच्या चुलत्याला घोटी पोलीसांनी ताब्यात

घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्तेच्या दरेवाडी येथे प्रेयसीकडून लग्नासाठी कायम तगादा होत असल्याने वैतागलेल्या प्रियकराने प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या केली. हा खून चुलत्याच्या मदतीने केल्याची केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित प्रियकर व त्याच्या चुलत्याला घोटी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीसांनी दिलेली माहीती अशी की, इगतपुरी तालुक्यातील काळुस्तेच्या दरेवाडी येथील अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणारी सविता सनु पारधी घटस्फोटामुळे माहेरी दरेवाडी येथे राहत होती. येथील दीपक चिमा गिरे याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. त्यातच या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीपक याचे वय कमी असल्याने वर्षभरानंतर लग्न करण्याचे ठरवले होते.दरम्यान दि. १३ नोव्हेंबर रोजी सविता पारधी ही अचानकपणे बेपत्ता झाली होती. नातलगांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तीचा कोठेही तपास लागला नाही. त्यामुळे तिच्या आई वडीलांनी ती बेपत्ता असल्याची तक्र ार इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.रविवारी भाम धरणाच्या वरील बाजूस एका निर्जन स्थळी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडला असून त्याबाबतची माहिती स्थानिक नागरीकांनी घोटी पोलीसांना दिली. पोलीसांनी सखोल तपास केल्यावर सदरचा मृतदेह दरेवाडी येथील बेपत्ता असलेल्या सविता हिचा असल्याचे निष्पन झाले.याबाबत घोटी पोलिसांनी संशयित म्हणून दीपक चीमा गिरे व त्याचा चुलता पूना सोमा गिरे यांना ताब्यात घेतले. त्यांनी सविता हिच्याकडून होणारा लग्नाचा तगादा सहन न झाल्याने तसेच या लग्नाला घरातुनही विरोध असल्याने तिला दगडाने ठेचुन मारून तिचा मृतदेह दुचाकीवरु न निर्जन स्थळी फेकून दिल्याची कबूली दिली.घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक शिर्मष्ठा वालावलकर यांच्यासह प्रभारी उपअधीक्षक भीमाशंकर ढोले, इगतपुरीचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. अप्पर अधीक्षक श्रीमती वालावलकर यांनी तपासकामी उपयुक्त सूचना दिल्या असुन घोटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंदा माळी, हवालदार धर्मराज पारधी, शीतल गायकवाड, लहू सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.(फोटो २५ खून)मयत महिलेचा फोटो.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीCrime Newsगुन्हेगारी