शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:51 PM

समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह सुरू असून, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा पंढरपूर येथील बाबूराव शास्त्री यांनी संत बहिणाबाई महाराज यांच्या अभंगावर दिली.

ठळक मुद्देबाबूराव शास्त्री : देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह

ममदापूर : समाज घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने संतांनी केले असून, समाजावर त्यांचे अनंत उपकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीवर प्रेम करावे, असे प्रतिपादन बाबूराव महाराज शास्त्री यांनी केले. येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बहिणाबाई महाराज यांचा फिरता नारळी सप्ताह सुरू असून, चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा पंढरपूर येथील बाबूराव शास्त्री यांनी संत बहिणाबाई महाराज यांच्या अभंगावर दिली.शास्त्री महाराजांनी ‘संतकृपा झाली, इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया। उभारीला देवालया। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ज्ञानदेव रचिला पाया। नामात याच्या किकिर त्याने केला विस्तार ज्ञानदेव रचिला पाया। हा बहिणाबाई महाराज याचा अभंग सेवेसाठी घेतला. शास्त्री महाराज पुढे म्हणाले, ज्ञानोबारायांनी सामाजिक समरसतेचा पाया घातला. त्यांनी कान्होपात्रा, गोरोबा कुंभार, चोखामेळा, संत सेना महाराज, सावता महाराज असे सर्व समाजाचे संत वाळवंटात एकत्र करून खºया अर्थाने पाया रचला. वारकरी धर्माचा प्रचार नामदेव महाराज यांनी केला. बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञानदेव महाराज यांनी पाया रचला तर याचा कळस तुकाराम महाराज यांनी केला. भूतलावावर जेवढे जीव आसतील त्यावर निरपेक्ष प्रेम करा, असे शास्त्री महाराज यांनी सांगितले.याप्रसंगी बहिणाबाई महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुसूदन महाराज, मोगल बाळासाहेब दाणे, संपत आहेर, भास्कर दाणे, मच्छिंद्र गुडघे, बाळासाहेब थोरात, गोपीनाथ दाणे, ज्ञानेश्वर काळे, अर्जुन दाणे, विनायक थोरात, रवींद्र दाणे, राजेंद्र दाणे, नवनाथ दाणे रखमा दाणे, सुनील गुडघे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सप्ताहाला ग्रामस्थांनी उपस्थितराहून कीर्तनाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचा समावेशबहिणाबाई महाराज यांचा सप्ताह मधुसूधन महाराज मोगल यांनी ३९ वर्षांपूर्वी सुरू केला आहे. देवदरी येथे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दोन ट्रॉली बाजरीच्या भाकरी व आमटी प्रसाद म्हणून देण्यात येत आहे. येथे ममदापूर, खरवंडी, देवदरी, राजापूर, कोळगाव, भारम, वाघाळा, रेडाळा, सोमठाण जोश या गावातील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक ज्ञानामृताचा लाभ घेत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम