स्कूटीवरील महिलेचे लाखाचे दागिने लंपास

By Admin | Updated: August 2, 2014 01:24 IST2014-08-02T00:27:32+5:302014-08-02T01:24:31+5:30

स्कूटीवरील महिलेचे लाखाचे दागिने लंपास

Louboutin louboutin sale of the woman on the scooter | स्कूटीवरील महिलेचे लाखाचे दागिने लंपास

स्कूटीवरील महिलेचे लाखाचे दागिने लंपास

नाशिकरोड : विहितगाव वडनेररोड येथे स्कूटीवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने हिसकावून पलायन केले. लॅमरोड महालक्ष्मी प्लाझा येथे
राहणाऱ्या विवाहिता विद्या बापू वावरे या गुरुवारी रात्री आपल्या भावाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त वडनेररोड येथील गुरुकृपा लॉन्स येथे गेल्या होत्या. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास त्या स्कूटीवरून जात असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना ‘ओ मॅडम’ असा आवाज दिल्याने त्यांनी गाडी स्लो केली. यावेळी त्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सात तोळे वजनाची सोन्याची पोत व नेकलेस ओढून चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Louboutin louboutin sale of the woman on the scooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.