यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता जिल्ह्यात पुराची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:43+5:302021-06-09T04:17:43+5:30

नाशिक : नैऋृत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने वेगाने मुसंडी मारली आहे. वेळेपूर्वीच यंदा महाराष्ट्रात मान्सून सरींचे आगमन झाले ...

A lot of rain this year; Fear of floods in the district after Corona! | यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता जिल्ह्यात पुराची धास्ती!

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता जिल्ह्यात पुराची धास्ती!

नाशिक : नैऋृत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने वेगाने मुसंडी मारली आहे. वेळेपूर्वीच यंदा महाराष्ट्रात मान्सून सरींचे आगमन झाले आहे. यंदा राज्यात सर्वदूर भरपूर पाऊस पडणार असल्याने जिल्ह्यांना आतापासूनच पावसाळापूर्व बळकट तयारी करावी लागणार आहे. कोरोनानंतर आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मनपा आपत्ती विभागापुढे पूरनियंत्रणाचे आव्हान उभे राहणार आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी १ हजार ४२५ मिमीपर्यंत पाऊस पडला होता. पर्जन्यमानाची टक्केवारी सरासरी ९५.५ इतकी राहिली होती. भारतीय वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी यापेक्षाही अधिक पाऊस जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक राहते. शहरासह जिल्ह्याची प्रमुख नदी गोदावरी असून गोदावरीच्या पूरनियंत्रण रेषेला लागून नागरिकांनी घरे बांधलेली आहे. त्र्यंबकेश्वरपासून तर थेट नाशिक जिल्ह्याच्या वेशीपर्यंत अशीच अवस्था आहे. जिल्ह्यातील पाच तालुके पूरबाधित असून यामध्ये निफाड, बागलाण, कळवण, दिंडोरी, नाशिक या ताुलक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सर्वेक्षण करून सुमारे ६४ धोकादायक पावस्थळी ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करण्यात आले आहे. दरवर्षी गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण होते. गोदाकाठालगतच्या पंचवटी, गंगापूर रोड, जुने नाशिकचा परिसर बाधित होतो. मनपा अग्निशमन विभागाकडे रबरी बोटींची संख्या केवळ बोटावर मोजण्याइतकीच आहे.

---इन्फो---

पूरबाधित क्षेत्रावर विशेष लक्ष

जिल्ह्यातील पाच तालुके पूरबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. या भागात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थतीचा सामना करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. १९ रेस्क्यू बोटींसह ५० जीवरक्षक व स्वयंसेवकांचे दल सतर्क असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास पूरनियंत्रण कक्ष व हेल्पलाइन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला ‘ॲलर्ट’वर राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

----पॉइंटर्स---

जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान १,४२५ मिमी

जिल्ह्यातील नद्या- ८

नदीशेजारील गावे- ८९

पूरबाधित होणारे तालुके-५

----चौकट---

जिल्हा - मनपा प्रशासनाची काय तयारी?

फायरमन-

पेट्रोल कटर-

लाइफ जॅकेट-

वॉटर पंप-

रेस्क्यू बोट- १९

जीवरक्षक- ५०

रबर बोटी- ९

गिर्यारोहक टीम- २०

---इन्फो--

अग्निशमन दल सज्ज

मनपा अग्निशमन दलाची सज्जता पूरनियंत्रणासाठी आहे. आवश्यक साधनसामग्री जरी या दलाकडे असली तरी मनुष्यबळ मात्र तसे अपुरेच आहे. राजीव गांधी भवन येथे २४ आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू (२५७१८७२/ २२२२४१३ ) प्रत्येक विभागनिहाय सहा कक्ष आहेत. मुख्य कक्षाद्वारे या कक्षांसह उद्यान, सार्वजनिक, विद्युत, भूमिगत गटार आदी विभागांशी समन्वय साधला जाणार आहे.

---इन्फो--

शहरातील धोकादायक इमारती

शहरात १ हजार २८७ धोकादायक मिळकती असून यामध्ये १ हजार २८७ इमारती धोकादायक स्थितीतील आहेत. धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संंख्या सुमारे ५ हजार इतकी आहेत. एकट्या काझी गढी या धोकादायक ठिकाणी अडीच हजार लोकांची वस्ती आहे.

शहरातील धोकादायक स्थितीतील झाडांची संख्याही मोठी आहे. बहुतांश झाडांच्या फांद्यांची छाटणी अशास्त्रीय पध्दतीने महावितरणच्या ठेकेदाराकडून करण्यात आल्याने अनेक डेरेदार झाडे धोकादायक बनली आहेत. याकडे मात्र मनपाचे उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीकडून कानाडोळा केला जात आहे. यामुळे वादळी पावसात झाडे कोसळण्याच्या घटना या सातत्याने शहरातील सहाही विभागांमध्ये घडत असतात. धोकादायक झाडे काढून घेण्याबाबत किंवा अन्य कुठल्याही उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही.

----कोट---

मान्सून दाखल झाला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. रेस्क्यू ऑपरेशनसाठी बोटी, मदतकार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक शोध व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आठवडाभरापासून २४ तास जिल्हाधिकारी कार्यालयात मदत व नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

---

फोटो आर वर :०८ मान्सून नावाने सेव्ह.

===Photopath===

080621\08nsk_9_08062021_13.jpg

===Caption===

मान्सुन दाखल....

Web Title: A lot of rain this year; Fear of floods in the district after Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.