मतदार नोंदणीला खो
By Admin | Updated: February 4, 2016 22:45 IST2016-02-04T22:44:08+5:302016-02-04T22:45:21+5:30
मतदार नोंदणीला खो

मतदार नोंदणीला खो
ब्राह्मणगाव : पूर्णवेळ तलाठी नसल्याने गैरसोयब्राह्मणगाव : येथील मतदार राष्ट्रीय मतदार दिनापासून अद्यापही वंचित असून, पूर्णवेळ तलाठी व बीएलओ नसल्याने नवीन मतदार नोंदणी, पत्त्यात बदल व अन्य कामांपासून दूर आहे. त्यामुळे पूर्णवेळ तलाठी देण्याची मागणी होत आहे.
येथे पूर्णवेळ तलाठी नाही. एकाच तलाठ्याकडे तीन गावे असल्याने त्यांना तीनही गावांना वेळ देताना तारेवरची कसरत करावी लागते. मतदार नोंदणीसाठी बीएलओ काम करत नाही. शिक्षकांनी तर त्या कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे नवीन नाव नोंदणी कोणाकडे करावी या द्विधाअवस्थेत नवीन मतदार आहे तर पूर्णवेळ तलाठी नसल्याने अनेक शासकीय योजना लाभार्थींपर्यंत पोहचत नाहीत. तेव्हा महसूल विभागाने ब्राह्मणगावची
लोकसंख्या पाहता पूर्णवेळ तलाठी व बीएलओ यांनी नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)