हरवलेला संवाद युवा पिढीसाठी घातक : नीला सत्यनारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:00 IST2020-01-10T23:58:10+5:302020-01-11T01:00:19+5:30

आपापसातील संभाषणाने दिवसाबरोबरच जीवन समृद्ध होते सध्याचा हरवलेला संवाद हा युवा पिढीसाठी घातक असल्याचे मत सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.

Lost dialogue is dangerous for the younger generation: Neela Satyanarayan | हरवलेला संवाद युवा पिढीसाठी घातक : नीला सत्यनारायण

हरवलेला संवाद युवा पिढीसाठी घातक : नीला सत्यनारायण

ठळक मुद्देमनमाड : विवेकानंद व्याख्यानमालेस प्रारंभ

मनमाड : आपापसातील संभाषणाने दिवसाबरोबरच जीवन समृद्ध होते सध्याचा हरवलेला संवाद हा युवा पिढीसाठी घातक असल्याचे मत सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.
येथील सीतालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘संवाद स्वत:शी’ या विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून् गटनेते गणेश धात्रक, समितीचे अध्यक्ष अमोल तावडे, सोमनाथ चिंचोरे, अशोक शिंगी, दुर्गा शाकद्विपी, किशोर नावरकर आदी उपस्थित होते. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी अतिथींच्या हस्ते स्वामी विवेकानंद याच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. योगेश म्हस्के यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय सिद्धांत लोढा यांनी करून दिला. रमाकांत मंत्री यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन योगेश सोनवणे यांनी केले. प्रकाश गाडगीळ यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Web Title: Lost dialogue is dangerous for the younger generation: Neela Satyanarayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.