झाड कोसळून मोटारीचे नुकसान

By Admin | Updated: September 6, 2016 00:54 IST2016-09-06T00:53:56+5:302016-09-06T00:54:27+5:30

अनर्थ टळला : बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राजवळील घटना

Loss of the tree collapsed | झाड कोसळून मोटारीचे नुकसान

झाड कोसळून मोटारीचे नुकसान

 नाशिक : त्र्यंबक रस्त्यावरून बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या कॉलनी रस्त्यावरील गुलमोहरचे मोठे झाड रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास अचानक कोसळले.
गणेशोत्सवानिमित्त दिवसभर या रस्त्यावरून कॉलेजरोड, कृषीनगर, पी अ‍ॅन्ड टी कॉलनी, शरणपूररोड या भागाकडे नागरिकांची ये-जा सुरू होती. अनेक लहान व मोठी मंडळे मिरवणुकीने वाजतगाजत गणरायाचे स्वागत करत मार्गस्थ होत होते. संध्याकाळी या रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले सुमारे दहा ते पंधरा वर्षे जुने गुलमोहरचे झाड अचानकपणे कोसळले. या वृक्षाचा बुंधा जमिनीपासून कुजलेला होता, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. ज्या ठिकाणी हे झाड पडले त्या ठिकाणी एक खासगी क्लास असून, दररोज संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत येथे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. बाप्पांच्या आगमनाच्या निमित्ताने क्लासला सुटी असल्याने विद्यार्थीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. रस्त्यालगत असलेल्या एका मारुती कारवर झाडाचे खोड पडले. या परिसरात राहणारे सोमिश तंत्रपाळे यांच्या मालकीची कार (एमएच १७, एएच १९०१) झाडाखाली दबल्याने नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांतच शिंगाडा तलाव येथील वीर बापू गायधनी अग्निशमन मुख्यालयाचा बंब व सहा ते सात जवान घटनास्थळी दाखल झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Loss of the tree collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.