शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

लालपरीची चाके थांबल्याने प्रतिदिन साडेतीन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:50 IST

पेठ : मागील वर्षी कोरोनाच्या संकटात सापडलेली लालपरी दिवाळीनंतर थोड्याफार प्रमाणात रुळावर येऊ पाहत असताना याही वर्षी मार्चपासून पुन्हा एकदा लालपरीची चाके थांबली गेल्याने पेठ आगाराला दररोज जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देपेठ तालुका : लांबपल्ल्यासह स्थानिक फेऱ्यादेखील रद्द

पेठ : मागील वर्षी कोरोनाच्या संकटात सापडलेली लालपरी दिवाळीनंतर थोड्याफार प्रमाणात रुळावर येऊ पाहत असताना याही वर्षी मार्चपासून पुन्हा एकदा लालपरीची चाके थांबली गेल्याने पेठ आगाराला दररोज जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे.आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी पेठ येथे बस आगार सुरू करण्यात आले असले तरी डोंगराळ प्रदेश, खराब रस्ते व प्रवाशांची अत्यल्प संख्या यामुळे पेठ आगाराला नेहमीच तोटा सहन करत प्रवासी सेवेचे ब्रीद जपावे लागले असताना कोरोनाच्या महामारीने मागील वर्षापासून परिवहन महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेठ आगारातून नाशिकसह पूणे, नगर, जळगाव, शिर्डी या प्रमुख मार्गावर बसेस धावत असतात. ग्रामीण भागातही हरसूल, दिंडोरी, ननाशी, जाहूले, भनवड, कळमुस्ते आदी मार्गावर बसफेऱ्या सुरू असताना कोरोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी घालून दिलेल्या निर्बंधामुळे पेठ आगारातील जवळपास ३५ गाड्या बंद करण्यात आल्या असून, पेठ ते नाशिक मार्गावर अत्यावश्यक सेवेसाठी दोन बसेस सुरू आहेत.त्यातही ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक केली जात असून, पेठ आगाराची दररोज १२ हजार किमीची धाव थबकल्याने साडेतीन लाख रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे.१८६ कर्मचाऱ्यांचे लसीकरणकोरोना काळात सेवा बजावणाऱ्या चालक-वाहकांसह प्रशासकीय कामकाज करणाऱ्या १८६ अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असली तरी आता सर्वांची तब्बेत सुधारत आहे.तसेच अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणाऱ्या बसेस आगारातून बाहेर काढण्यापूर्वी निर्जंतुकीकरण केल्या जात असून, चालक-वाहकही आवश्यक ती काळजी घेत आहेत.पेठ हा दुर्गम तालुका असून, प्रवाशांकडे दळणवळणाची स्वतःची फारशी साधने नसल्याने महामंडळाच्या बसेसवर प्रवासी अवलंबून असतात. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व खराब रस्त्यामुळे जमा खर्चाचे गणित जुळत नसले तरी प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या बसेसला एक वर्षापासून ब्रेक लागल्याने महामंडळाला करोडोंचे नुकसान सहन करावे लागत आहे.-स्वप्नील अहिरे, आगार व्यवस्थापक, पेठपेठ आगारातील सांख्यिकी स्थितीएकूण वाहने - ३७बंद असलेली वाहने - ३५चालक संख्या - ८४वाहक संख्या - ९३यांत्रिकी संख्या - ३०प्रशासकीय कर्मचारी - २४कोरोनाबाधित कर्मचारी - २१. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ