विहिरीत पडलेल्या तरसाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:47 IST2020-04-02T21:47:30+5:302020-04-02T21:47:47+5:30
सायगाव फाटा येथे विहिरीत पडलेल्या तरसाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.

विहिरीत पडलेल्या तरसाला जीवदान
येवला : तालुक्यातील सायगाव फाटा येथे विहिरीत पडलेल्या तरसाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
सायगाव फाटा येथील (शंकरवाडी) येथील सोमनाथ बाबूराव घोडके यांचे मालकीच्या शेतातील विहिरीत तरस पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनरक्षक हरगावकर दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत ३० फुटावर उतरले. त्यांनी तरसाला पिंजºयात बंद केले. या मोहिमेत संजय भंडारी, मोहन पवार, वनरक्षक प्रसाद पाटील, विलास देशमुख, सुनील बुरु ख, मच्छिंद्र आरखडे, मयूर मोहन व स्थानिक शेतकरी यांचे सहकार्य लाभले.