पावसामुळे पिकांची हानी

By Admin | Updated: March 5, 2016 22:00 IST2016-03-05T21:58:18+5:302016-03-05T22:00:06+5:30

कळवण : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन, नुकसानभरपाईची मागणी

Loss of crops due to rain | पावसामुळे पिकांची हानी

पावसामुळे पिकांची हानी

 कळवण : शहर व तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल, कृषी विभागाने दिरंगाई न करता युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी व कृषिपंपांचे कनेक्शन तोडू नये, अशी मागणी कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार अनिल पुरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्याने कर्ज काढून कशीबशी लागवड केली होती. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे. पिकांवर तेल्या, प्लेग, मर, डावणी, भुरी, करपा आदि रोगांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात अवकाळी पावसाने द्राक्ष, भात, टमाटा, डाळिंब, द्राक्ष आदि हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच रब्बीची कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला ही पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रसने एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, गटनेते कौतिक पगार, राजेंद्र पवार, मजूर संघाचे संचालक हरिभाऊ वाघ , राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, नगरसेवक जयेश पगार, सुभाष शिरोरे, विठोबा पाटील विलास रौंदळ, रामा पाटील, सागर खैरनार, उमेश सोनवणे आदि उपस्थित होते.

Web Title: Loss of crops due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.