जखमी मोराला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:30 IST2017-08-08T00:29:38+5:302017-08-08T00:30:01+5:30
येथे पक्षिमित्रांनी जखमी झालेल्या दीड वर्षीय मोराला जीवदान दिल्याची घटना घडली. सायगाव येथील शेतकरी सुभाष पठारे यांच्या शेतात मोठ्या संख्येने कावळे का जमले, याबाबत शोध घेतला असता शेतात एक मोर जखमी अवस्थेत मिळून आला. त्यांनी तत्काळ नातेवाइकांसह ग्रामस्थांना माहिती दिली.

जखमी मोराला जीवदान
सायगाव : येथे पक्षिमित्रांनी जखमी झालेल्या दीड वर्षीय मोराला जीवदान दिल्याची घटना घडली. सायगाव येथील शेतकरी सुभाष पठारे यांच्या शेतात मोठ्या संख्येने कावळे का जमले, याबाबत शोध घेतला असता शेतात एक मोर जखमी अवस्थेत मिळून आला. त्यांनी तत्काळ नातेवाइकांसह ग्रामस्थांना माहिती दिली. जखमी मोराला उपचारासाठी पोलीसपाटलाच्या घरी आणले. पशुवैद्यक भाऊलाल पवार यांना उपचारासाठी बोलावून घेतले. त्यांनी मोरावर प्राथमिक उपचार केले. या मोराच्या पंखाच्या खालील बाजूस गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचार करून सदर मोरास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. पक्षिमित्र बशीरभाई शेख, पोलीसपाटील प्रीती दौंडे, ज्ञानेश्वर भालेराव, संतोष दौंडे, शिवाजी दौंडे, साताळकर यांनी याकामी मदत केली.