उशाखालील ५० हजारांचा सोन्याचा हार लंपास
By Admin | Updated: May 30, 2014 01:03 IST2014-05-30T00:57:15+5:302014-05-30T01:03:42+5:30
नाशिक : घरफ ोड्या, सोनसाखळी चोरी असे प्रकार शहरात सर्रासपणे चालू आहेत; मात्र नाशिकरोडच्या विजयनगर येथे झोपलेल्या महिलेच्या उशाखालील ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरट्यांनी अलगद पळविल्याची घटना घडली आहे़

उशाखालील ५० हजारांचा सोन्याचा हार लंपास
नाशिक : घरफ ोड्या, सोनसाखळी चोरी असे प्रकार शहरात सर्रासपणे चालू आहेत; मात्र नाशिकरोडच्या विजयनगर येथे झोपलेल्या महिलेच्या उशाखालील ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरट्यांनी अलगद पळविल्याची घटना घडली आहे़
याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयनगर येथील गजनिवास अपार्टमेंटमधील तुकाराम गवळा भालेराव व त्यांच्या पत्नीने गळ्यातील सोन्याचा हार काढून स्वत:च्या उशाखाली घेऊन ते झोपी गेले होते़ उकाडा असल्याने त्यांनी खिडकी उघडी ठेवली होती़ चोरट्यांनी खिडकीतून हात घालून अलगदपणे उशाखालील सोन्याचा हार पळवून नेला़ अज्ञात चोरट्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़