शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

भगवान महावीर जयंती मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:04 IST

‘भगवान महावीर की जय’चा जयघोष करीत भगवान महावीर यांच्या चित्ररथांची बुधवारी (दि.१७) शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. जैन सेवा संघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने दहीपूल येथील धर्मनाथ देरा सर येथून अहिंसा परमो धर्म की जय, जैन धर्म की जय, जोर से बोलो जय महावीर असा जयघोष करीत ढोल पथकाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

नाशिक : ‘भगवान महावीर की जय’चा जयघोष करीत भगवान महावीर यांच्या चित्ररथांची बुधवारी (दि.१७) शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. जैन सेवा संघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने दहीपूल येथील धर्मनाथ देरा सर येथून अहिंसा परमो धर्म की जय, जैन धर्म की जय, जोर से बोलो जय महावीर असा जयघोष करीत ढोल पथकाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भगवान महावीर यांच्या ध्यानस्थ प्रतिमेच्या चित्ररथासोबतच मतदान जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. ‘गोधन बचाव’चा संदेश देणारा चित्ररथ शोभायात्रेचे आकर्षण ठरला. शोभायात्रेत आचार्य भव्यभूषण सूरिश्वरजी आदी ठाणा, शिवसुंदर विजय आदि ठाणा, शंकरलाल गांग, अशोक मोदी, कांतीलाल कोठारी, अजय ब्रम्हेचा, पारस लोहाडे, डॉ. अतुल जैन, कैलास पहाडे, सुधीरकुमार काले, अभय हातेड आदी सहभागी झाले होते.पवन पाटणी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र पहाडे, जयेश शहा, ललित मोदी यांनी केले. सुमीत पटवा यांनी आभार मानले.संपूर्ण विश्वासाठी गौरवाचा दिवसभगवान महावीर जन्मोत्सव हे पर्व जैन समाजाचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचा गौरव दिवस आहे. समाज बांधवांनी भगवान महावीर यांचा सत्य, अहिसाचा संदेश संपूर्ण विश्वात न्यावा. क्रोध, मोह, माया, लोभ, अहंकार यांचा त्याग केल्यास प्रत्येक आत्मा परतात्मा बनू शकतो, असे यावेळी मार्गदर्शन करतांना साध्वी डॉ. पुण्यशिलाजी व साध्वी कीर्तीशिलाजी यांनी सांगितले.सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हातजैन सोशल ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४०० हून अधिक जैन बांधवांनी रक्तदान केले. याचबरोबर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ७०० टॅँकरद्वारे जिल्ह्यातील १० दुष्काळग्रस्त गावात पाण्याचे तसेच चाऱ्याचे वाटप केले जाणार असल्याचे यावेळी जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्ष मुग्धा शहा यांनी सांगितले.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवNashikनाशिक