भगवानला प्रतीक्षा जागतिक सुवर्णपदकाची

By Admin | Updated: June 20, 2014 01:18 IST2014-06-20T00:56:47+5:302014-06-20T01:18:20+5:30

मालेगाव ; भगवानला प्रतीक्षा जागतिक सुवर्णपदकाची

Lord awaiting the World Gold Medal | भगवानला प्रतीक्षा जागतिक सुवर्णपदकाची

भगवानला प्रतीक्षा जागतिक सुवर्णपदकाची

शफीक शेख ल्ल मालेगाव
मालेगाव पोलीस दलातील शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी भगवान सोनवणे हे सेऊल येथे होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मुंबईहून रवाना झाले. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याची त्यांची अपेक्षा आहे.
भगवानला दहावीला असताना १९९२पासूनच व्यायामाची आवड निर्माण झाली. १९९३मध्ये नाशिकला पहिली ईगल श्री शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. त्यात त्याने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर त्याला शरीरसौष्ठव स्पर्धेची आवड निर्माण झाली. १९९७ला तो नाशिकश्री झाला. १९९७ ते २००२ पर्यंत जिल्ह्यात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्याला सुयश मिळाले.
पुणे, सांगली, मुंबई, अमरावती, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने सहा सुवर्णपदके मिळवली आहेत.
गेल्या महिन्यात कोलकाता येथे झालेल्या भारतश्री स्पर्धेत त्याने तिसरा क्रमांक पटकावला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असाना दीपक बागुल, गोपाळ गायकवाड, गोपीनाथ रोडे, अशोक दिंडे यांच्या मार्गदर्शनामुळे त्याचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला. घरातली परिस्थिती जेमतेम असल्याने २००० मध्ये तो पोलिसांत भरती झाला. २००३-२००७च्या दरम्यान त्याच्या आईवडिलांचे निधन झाले. साहजिकच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भगवान सोनवणे यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे तीन वर्षे व्यायामात खंड पडला.
रोज सकाळी आणि संध्याकाळी एकेक तास त्याचा व्यायाम ठरलेला असतो. विशेष म्हणजे त्यासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक बुधवंत त्याला मार्गदर्शन करतात याचा त्याला अभिमान वाटतो.

Web Title: Lord awaiting the World Gold Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.